प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यातील भोसरे (कुर्डुवाडी) १ पुरुष , रिधोरे १ स्त्री व आकुंभे १ पुरूष याप्रमाणे तीघा जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी ज्योती कदम यांनी दिली. माढा तालुक्यात एकावेळी तीन वेगवेगळ्या गावात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
यापूर्वी माढा तालुक्यात लऊळ येथील एका मृत महिलेचा व मुंबईहून कुर्डुवाडी येथे बंदोबस्तासाठी सुरक्षा बलाच्या ६ जणांना तसेच दारफळ येथील १ ला कोरोनाची लागण झाली होती. यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वॅब हे निगेटीव्ह आले आहेत. परंतू कुर्डुवाडी व भोसरे शहरात यापूर्वी कोणताही रुग्ण नसताना व ट्रव्हल हिस्ट्री नसताना भोसरे येथील व्यक्तीला लागण कशी झाली. या चर्चेला उधाण आले असून नागरिक भयभीत झाले आहेत.
भोसरे येथील व्यक्ती उपचारासाठी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून शहरातील तीन खाजगी रूग्णालयात गेली असल्याची माहिती समोर येत आहे. दोन हॉस्पीटलमध्ये त्यांनी केवळ तपासणी केली व तिसऱ्या एका खाजगी हॉस्पीटलमध्ये अॅडमीट होऊन दोन दिवस इनडोअर ट्रीटमेंट घेतली आहे.त्यानंतर रविवारी २८ रोजी बार्शी येथील खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले.तेथे त्यांचा स्वॅब घेतला असता तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उद्या रुग्णाच्या संपर्कातील वीस जणांचे स्वॅब घेतले जाणार आहेत.
Previous Article‘किसान सन्मान’ मधिल ५० हजार शेतकरी वंचित
Next Article जगभरात 61.72 लाख रुग्ण कोरोनामुक्त








