तरुण भारत संवाद प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात आज मंगळवारी ६१ कोरोनाबाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य प्रशासनाला प्राप्त झाला असून शिराळ, अंबाड, अकुलगांव, दारफळ, रिधोरे, भोसरे, लोंढेवाडी, विठ्ठलवाडी, व्होळे, जाधववाडी, मोडनिंब, बेंबळे, माढा, कुर्डुवाडी येथे हे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात शिराळ येथे १, अंबाड येथे १, अकुलगांव येथे १, दारफळ येथे २१, रिधोरे येथे २, भोसरे येथे ६, लोंढेवाडी येथे ६, विठ्ठलवाडी येथे १, व्होळे येथे १, जाधववाडी येथे १, मोडनिंब येथे १, बेंबळे येथे ४, माढा येथे २ ,कुर्डुवाडी येथे १३ जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा १८८१ झाला असून यामधील ९७८ बाधित उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित ९०३ जणांवर उपचार सुरु आहेत. तर लव्हे येथील एक महिला मृत झाली असून आतापर्यंत ५३ जणांचा मृत्यू झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात आहे.









