कुर्डुवाडी/प्रतिनिधी
माढा तालुक्यात आज नव्याने एकूण २२ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागाला प्राप्त झाला असून तालुक्यातील एकूण बाधितांचा आकडा ४८० झाला असल्याचे तालुका आरोग्य विभागाचे संतोष पोतदार यांनी सांगितले.
तालुक्यात मानेगाव येथे १०, मोडनिंब व केवड येथे प्रत्येकी १, पिंपळनेर येथे ७ व पालवण येथे ३ व्यक्ती असे २२ जण कोरोना बाधित आढळल्याचे समोर आले आहे. सदरच्या बाधित व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती तालुका आरोग्य विभागाकडून घेतली जात असून सदरचा परिसर कंटेन्मेंट झोन करुन प्रतिबंधीत करण्यात आला आहे.
कुर्डुवाडीकरांसाठी समाधानाची बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात सोमवार आणि मंगळवार रोजी शहरात एकही कोरोना बाधित नाही असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.संतोष अडागळे यांनी सांगितले.
तालुक्यात आज पर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून २०७ जणांवर उपचारानंतर बरे होऊन घरी गेले असल्याचे पोतदार यांनी सांगितले.








