प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तालुक्यात ७ गावांत एकूण १५ जण कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. कव्हे, मानेगाव, विठ्ठलवाडी, उपळाई खु, अरण, टेंभुर्णी टाकळी टें येथे हे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यात एकूण १७२ पैकी ६८ अॅन्टीजेन व १०४ स्वॅब तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी कव्हे येथे १, मानेगाव येथे ५,विठ्ठलवाडी येथे ३,उपळाई खु येथे १, अरण येथे १,टेंभुर्णी येथे ३ , टाकळी टें येथे १ जण असे एकूण १५ जण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात समोर आले आहे.तर २ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. तालुक्यात रोज नवनवीन भागात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत.तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासन आपल्यापरीने उपाययोजना करत असून नागरिकांनीही आपली जबाबदारी अोळखून सर्वोतोपरी काळजी घेतली पाहिजे.









