प्रतिनिधी / कुर्डुवाडी
माढा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून आज तालुक्यातील ५४ गांवात मिळून एकूण २०२ जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर ६२ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे तालुका वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आज बारलोणी, रिधोरे, रोपळे क, धानोरे, बुद्रुकवाडी ,उपळाई बु, चिंचोली, भेंड, बावी ,उजनी मा, अकोले बु, पिंपळखुंटे, शिराळ मा, नगोर्ली, माळेगाव, टाकळी टें, आढेगाव ,रांझणी, जाधववाडी मा, भुताष्टे ,अंजनगाव खे, विठ्ठलवाडी, नाडी, वडाचीवाडी आदी गावांत प्रत्येकी १ बाधित असून मोडनिंब, अरण, बैरागवाडी, घोटी, लव्हे, अंबाड ,पिंपळनेर, शेवरे ,चांदज, उपळवटे या गावांत प्रत्येकी २ , बेंबळे, परितेवाडी, आहेरगाव, आलेगाव बु या गावांत प्रत्येकी ३, निमगाव मा येथे ४, खैराव, उंदरगाव, वेणेगाव, तांबवे या गावांत प्रत्येकी ५, व्होळे येथे ६, सापटणे टें ,माढा येथे ७, भोसरे येथे ८, अकोले खु., परिते येथे ९,लऊळ येथे १०, शेडशिंगे येथे १३, टेंभुर्णी येथे १७,कुर्डुवाडी आणि तुळशी येथे १८ असे ५४ गावांत मिळून एकूण २०२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
वरचेवर माढा तालुक्याची परिस्थिती गंभीर होत चालली असून वरचेवर रोज नवे रुग्ण आढळत आहेत. कुर्डुवाडी शहरात तीन कोविड हॉस्पिटल असून सध्या तेथेही बेड शिल्लक नाहीत. कोणाला डिस्चार्ज मिळाला तरच बेड शिल्लक राहतो. कोविड केअर सेंटरचीही हीच परिस्थिती असून आज कुर्डुवाडी येथे शासकीय मुलींचे वस्तीगृह येथे नवीन कोविड केअर सेंटर चालू करण्यात आले आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गरजेशिवाय बाहेर पडू नये. होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी राहूनच उपचार घ्यावेत विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरून इतरांना धोका पोहचेल अशी वर्तणूक करु नये.
Previous Articleसोलापूर जिल्ह्यात दीड हजार नवे कोरोना रुग्ण, 24 मृत्यू
Next Article पश्चिम बंगालमध्ये भाजपमुळे कोरोना









