प्रतिनिधी / कुर्डुवाडी
शेतीच्या कारणावरून नानासाहेब अरुण कदम रा.घाटणे ता.माढा यास जबर मारहाण करुन खून झाला. याप्रकरणी आरोपी असणाऱ्या चौंघांपैकी मृताच्या चुलत्यासह तिघांना कुर्डुवाडी पोलिसांनी ४८ तासात अटक केली. आरोपींना न्यायालयापुढे हजर केल्यानंतर त्यांना दि.१६ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दि.२८ एप्रिल रोजी सायं ५.४५ च्या सुमारास नानासाहेब कदम हे घाटणे येथील त्यांच्या चुलत्याच्या घरी गेले होते. यावेळी शेतीच्या कारणावरून चुलते मोहन निवृत्ती कदम, चुलत भाऊ गणेश मोहन कदम, प्रशांत शिवाजी लोंढे व सयाजी शिवाजी लोंढे रा.महिंसगाव यांच्यात शेतीवरून वाद झाला. नानासाहेब यांना लोखंडी पाईप व लाकडी काठ्यांच्या सहाय्याने मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी नानासाहेब कदम यांचा कुर्डुवाडी, बार्शी व सोलापुर येथील सरकारी व खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान दि. ७ मे रोजी सोलापुर येथे मृत्यू झाला .
याबाबत मृताचा भाऊ उमेश अरुण कदम रा.घाटणे यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वीनी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे,उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गोरख गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलिस अंमलदार सागर गवळी,दत्ता सोमवाड, बाबासाहेब घाटगे, विश्वजित ठोंगे, सर्जेराव कर्चे, नितीन गोरे, ललित शिंदे, सिद्धनाथ वलटे, सायबर शाखेचे आर एम जाधव या पथकाने खबऱ्याकडून माहिती मिळवत वरील चार संशयित आरोपींपैकी मोहन कदम, गणेश कदम, सयाजी लोंढे या तिघांना अटक केली.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यात ‘म्युकर मायकोसिस’चा धोका वाढला
Next Article वाकरे येथे तलाव उत्खननात सापडली १८८९ सालातील नाणी









