माडग्याळ / वार्ताहर
जत तालुक्यातील माडग्याळ येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रथमिक आश्रम शाळेतील येथील सहा विद्यार्थ्यांचे सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सकाळी नियमित शाळेसाठी विद्यार्थी आले असता काही विद्यार्थी निवासी आहेत. दोन निवासी विद्यार्थ्यांना आज सकाळी ताप व सर्दी झाल्याचे निदर्शनास आले. मुख्याध्यापकाना शंका येताच त्यांनी लगेचच ग्रामीण रुग्णालय माडग्याळ येथे उपचारासाठी दाखल केले असता त्यांची कोरोना तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळून आले.
त्यामुळे लागलेच शाळेतील ऐंशी विद्यार्थी व बारा शिक्षकांची कोरोना तपासणी केली असता ऐकून सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सदर विद्यार्थ्यांना उपचार करून पालकांच्या ताब्यात देवून शाळा बंद ठेवण्यात आली आहे. सदरच्या घटनेमुळे विद्यार्थींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना माडग्याळ गावात समजताच गावातही नागराकांमध्ये खळबळ उडाली आहे.







