ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. माटुंगा रेल्वे स्थानाकावरील पुलावर एक धक्कादायक घटना घडली आहे. या पुलावर एका व्यक्तीने तरुणीची छेड काढली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हा व्यक्ती रेल्वे स्थानकावर महिलांना स्पर्श करताना सीसीटीव्हीत स्पष्ट दिसत आहे. इतकंच नाही तर तो हस्तमैथून देखील करत होता. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
माटुंगा रेल्वे स्थानकावरील पुलावर २६ जानेवारीला रात्री ही घटना घडली आहे. माटुंगा पुलावर गर्दी नव्हती. त्याठिकाणावरुन तरुणी एकटी जात असल्याचा फायदा घेत एका व्यक्तीने तिची छेड काढली. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.









