ऑनलाईन टीम / मुंबई :
पश्चिम रेल्वेच्या माटुंगा आणि माहिम स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळाला तडे गेल्याने चर्चगेटकडे येणाऱया धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
सकाळी ऐन गर्दीच्या काळातच वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. दोन्ही स्टेशनवर प्रवाशांची गर्दी झाली आहे. चर्चगेटहून अंधेरीला येणारी धीमी वाहतूक जवळपास 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. घटनास्थळी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाले असून, रुळाच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरु आहे.
कालही सायन आणि माटुंगा स्टेशनदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.









