ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
पतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाच्या या निर्णयावर निर्भयाची आई आशा देवी यांनी समाधान व्यक्त केले आहे.
त्या म्हणाल्या, आज माझ्या मुलीला न्याय मिळाला. या चारही दोषींना फाशीची शिक्षा मिळाल्याने देशातल्या महिलांना बळ येईल. या निर्णयामुळे लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित राहील.
यावेळी त्यांनी या प्रकरणात त्यांच्या परिवाराला साथ देणाऱया संपूर्ण देशाचे आभार मानले आहेत. दरम्यान, कोर्टाने आज चारही दोषींना डेथ वॉरंट जारी केला. 22 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता तिहार तुरुंगात त्यांना फाशी दिली जाणार आहे.









