मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांचा दावा
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत पलक्कड विधानसभा मतदारसंघावर सर्वांची नजर लागून राहिली आहे. भाजपच्या वतीने मेट्रोमॅन ई. श्रीधरन येथून निवडणूक लढवत आहेत. मतदान पेल्यावर श्रीधरन यांनी भाजपमधील माझ्या प्रवेशामुळे केरळमधील पक्षाची प्रतिमा बदलल्याचे म्हटले आहे.
पोन्नानी येथील मतदान केंद्रावर श्रीधरन हे पत्नीसह मतदानासाठी पोहोचले होते. मी माझे कर्तव्य पार पाडले आहे, लोक राज्याच्या विकासासाठीच मतदान करत आहेत. राज्याची सेवा सुरू ठेवण्याच्या इच्छेतूनच भाजपची निवड केल्याचे श्रीधरन म्हणाले.
विजयाची पूर्ण अपेक्षा
भाजप या निवडणुकीत केरळमध्ये उत्तम कामगिरी करणार असल्याची अपेक्षा श्रीधरन यांना आहे. पलक्कड मतदारसंघात मी मोठय़ा फरकाने विजयी होणार आहे. भाजप मला राज्याचा मुख्यमंत्री होण्याचा प्रस्ताव देऊ शकतो असे त्यांनी म्हटले आहे.
चुरशीची निवडणूक
केरळमध्ये सत्तारुढ माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफ आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफमध्ये मुख्य लढत अपेक्षित आहे. तर भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआनेही राज्यात जोरदार प्रचार केला आहे. या तिन्ही आघाडय़ांची कामगिरी पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









