कोल्हापूर : प्रतिनिधी
बंटी पाटील तुम्ही मराठा आहात असे म्हणता. एका भाषणात तुम्ही समोरुन वार करतो असे म्हणाला होता. पण यादव-दिवाणजीवर आरोप करण्यापेक्षा थेट माझ्यावर वार करा. मी समर्थ आहे. असे थेट आव्हान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिला आहे. ते कोल्हापुरातील लाईन बाजार परिसरात बोलत होते.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, मी विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत असताना कोणाचं नाव घेतलं नाही. मात्र मी टोपी फेकली आणि ती बंटी पाटलांना बसली. त्यावर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सतेज पाटील यांनी अपुरी माहिती असल्याचे सांगितले. मात्र मला येणारी माहिती अपुरी असू शकते.असेही भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुळात हा प्रश्न सुनील कदमांचा आहे. ते लढा ते देत आहेत. त्यात ते न्यायालयातही गेले आहेत. लोकप्रतिनिधी या नात्याने मी तो प्रश्न विधिमंडळात उपस्थित केला आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.