ऑनलाईन टीम / डेहराडून
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॅाकी संघाने चांगली खेळी केली आहे. यामुळे देशभरातून हॅाकीपट्टूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संघाने दिलेल्या निकराच्या लढ्याने भारतीयांची मने ही जिंकली आहेत. असे असले तरी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत केले. याबद्दल नाराजी व्यक्त करत पराभवाचे खापर फोडण्यासाठी काही समाजकंटकांनी हॉकीपटू वंदना कटारियाच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली होती. तसेच तीच्या घरासमोर फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला होता. याला आठवडा उलटल्यानंतर वंदनाने कोणतीच प्रतिक्रीया दिली नसली तरी आज ट्विट करत झालेल्या प्रकाराबद्दल तीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
तीने आपल्या ट्वीटमध्ये ”आधीच मी आणि माझे कुटुंबीय कठीण काळातून जात आहोत. यातच काही जण सोशल मीडियावर माझ्या नावाचे बनावट अकाउंट काढत त्यावरुन ट्विट करत आहेत. कृपया हे प्रकार थांबवा. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. आमचा त्रास अधिक वाढवू नका. तसेच सर्वांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल खुप खुप आभार” उत्तराखंड राज्य सरकारने तीला प्रोत्साहनपर २५ लाखांचे बक्षिस जाहीर केले असून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली