वृत्तसंस्था/ कोलकाता
मी पूर्वीप्रमाणे ठणठणीत आहे, असे प्रतिपादन भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी केले आहे. येथील वूडलँड्स हॉस्पिटलमधून त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आल्यानंतर ते बोलत होते.
काही दिवसापूर्वी गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर वैद्यकीय इलाजासाठी येथील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पाच दिवसांच्या कालावधीत त्याच्यावर अँजिओप्लॅस्टी करण्यात आली होती. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्याने त्यांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला. आणखी काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर गांगुली पुन्हा पूर्वीप्रमाणे आपल्या नियमित कामकाजाला प्रारंभ करणार आहेत. या रूग्णालयातील डॉक्टरांचे सौरभ गांगुली यांनी आभार मानले आहेत.









