नवी दिल्ली / वृत्तसंस्था
माजी भारतीय हॉकीपटू व प्रशिक्षक एम. के. कौशिक यांचे शनिवारी कोरोनामुळे निधन झाले. मागील 3 आठवडय़ांपासून ते कोरोनविरुद्ध लढत होते. 66 वर्षीय कौशिक यांच्या पश्चात मुलगा व पत्नी असा परिवार आहे.
रविंदर पाल सिंग यांच्याप्रमाणेच एम. के. कौशिक यांचाही 1980 ऑलिम्पिक सुवर्णजेत्या भारतीय संघात समावेश होता. दि. 17 एप्रिल रोजी कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना इस्पितळात दाखल केले गेले होते. एम. के. कौशिक यांनी भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही संघांना प्रशिक्षण दिले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय पुरुष संघाने 1983 मध्ये बँकॉक आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकले होते. 1998 मध्ये कौशिक यांना अर्जुन पुरस्काराने व 2002 मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले.









