प्रतिनिधी / ओटवणे:
सांगेली मधली वाडी येथील माजी सैनिक विठ्ठल रामा राऊळ (७६) यांचे शुक्रवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. भारतीय सैन्यदलातुन सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सांगेली ग्रामपंचायत सदस्य, सांगेली गिरिजानाथ ग्रामविकास मंडळ या शैक्षणिक संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष, सैनिक पतसंस्थेचे संस्थापक संचालक आदी विविध पदावर काम करून सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रात आपले योगदान दिले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत राऊळ कुटुंबियांचे सांत्वन केले. सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कासार्डे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक रामचंद्र राऊळ तसेच गोवा येथील ॲक्सिस बँकेच्या पणजी शाखेचे सहाय्यक व्यवस्थापक राजेश राऊळ यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, तीन मुली, सुना, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.
Previous Articleमालवणात ग्राहक संरक्षण कायद्या विषयी मार्गदर्शन
Next Article महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर









