ओटवणे / प्रतिनिधी:
ओटवणे करमळगाळूवाडी येथील माजी सैनिक रामचंद्र नारायण देवधर (८५) यांचे शनिवारी २५ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. रामचंद्र देवधर यांनी मराठा लाईट इन्फ्रंटीमार्फत भारतीय लष्करात सेवा बजावताना १९६५ आणि १९७२ च्या लढाईत भाग घेतला होता. भारतीय सैन्य दलात सेवा बजावूनही ते पेन्शन पासून वंचित होते. भालावल गावचे ते पौराहित्य करीत असत. गेले काही वर्षे ते आजारी होते. शनिवारी सायंकाळी उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भालावल गावचे पौरोहित्य करणारे अभय देवधर यांचे ते वडील तर सेवानिवृत्त वनपाल गोविंद देवधर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, दोन मुली, सून, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे.









