राजेंद्र होळकर : कोल्हापूर
शहरातील जीवबा नाना पार्कमधील रायगड चौकात राहणाऱ्या एका माजी सैनिकाने स्वतःहून पिस्तुलातून डोकीत गोळी मारुन घेवून आत्महत्या केली. दिनकर पांडूरंग मगदूम ( वय ४५ ) असे त्यांचे नाव आहेफ या घडल्या घटनेने जीवबा नाना पार्कमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याची नोंद पोलिसात झाली आहे.
माजी सैनिक दिनकर मगदूम काही महिन्यापूर्वी सैन्यातून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांची पत्नी व मुले काही दिवसांपूर्वी पाचगाव ( ता. करवीर ) येथे राहत असलेल्या भावाकडे राहण्यास गेली आहेत. त्यामुळे ते घरी एकटेच राहत होते. यावेळी त्यांनी स्व:ताच्या पिस्तुलातून डोकीत गोळी मारुन घेवून आत्महत्या केली. या घडल्या घटनेची माहिती समजताच करवीरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिल पाटील आपल्या सहकाऱ्यांच्या समवेत घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









