प्रतिनिधी /बेळगाव
मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे 13 व 14 सप्टेंबर रोजी जी. डी. व क्लार्क पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. मराठा इन्फंट्रीमधील माजी सैनिकांसाठी ही भरती प्रक्रिया असणार आहे. जी. डी. पदासाठी 46 वयोगटाखालील तर क्लार्क पदासाठी 48 वयोगटाखालील उमेदवारांनी अर्ज करावयाचा आहे. इच्छुकांनी मराठा लाईट इन्फंट्रीशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.









