वाकरे / प्रतिनिधी
कुडीत्रे (ता.करवीर) येथील श्रीराम हायस्कुलच्या २०१३-१४ च्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. करवीर तालुक्यातील दुर्गम भागातील रस्त्याचे काम करणाऱ्या गोरगरीब लोकांना एक महिण्याचे धान्य देऊन त्यांनी सामाजिक बांधिलकी जपली.
कोवीड लॉकडाऊनच्या कालावधीत श्रीराम हायस्कूल,कुडित्रे येथील सन २०१३-१४ बॅच”सोलमेट्स” या व्हॉटसअप ग्रूपच्या मुला-मुलींमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली. या मुला-मुलींनी सोशल मीडियाचा वापर करून आपण काहीतरी सामाजिक कार्य करु अशी एक संकल्पना डोक्यात आणली. यातूनच “सोलमेट्स” या व्हॉटसअप ग्रुपवर असणार्या सर्व मुलामुलींनी या संकल्पनेला प्रतिसाद दिला.
करवीर तालुक्यातील दुर्गम भाग असलेल्या स्वयंभूवाडी ते धनगरवाडी यादरम्यान रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या कामावर जवळजवळ दहा कुटुंबे आपल्या सर्व कुटुंबासहित काम करत आहेत. या लॉकडाऊनमुळे या कुटुंबांना एका वेळेचे जेवणासाठी लागणारे लागणारे धान्य मिळणे मुश्किल झाले होते. ही बाब या मुलांच्या निदर्शनास आली. या सर्व मुलांनी आपल्याकडे साठवलेले पैसे जमा करून स्वयंभूवाडी ते धनगरवाडी यादरम्यान रस्त्याचे काम करणाऱ्या सर्व कुटुंबांना महिनाभर पुरेल एवढे धान्ये देण्याचे ठरवले. या कुटुंबांना महिन्याभराचे तांदूळ, तूरडाळ, साखर, गोडेतेल, चहापूड, मीठ, बिस्कीटपुडे अशा जीवनावश्यक वस्तू देऊन एक आदर्श सामजिक उपक्रम राबविला आहे.
या त्यांच्या सामाजिक कार्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. हा उपक्रम आसाच निरंतन सुरू ठेवणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. तसेच समाजात गरजू व गरीब असणाऱ्या लोकांना आम्ही यापुढे ही मदत करणार आहोत. असे सांगीतले. या करिता सोलमेट्स या ग्रुप शी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









