प्रतिनिधी /बेळगाव
ठळकवाडी हायस्कूलच्या 1996-97 च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना साऊंड बॉक्सची भेट दिली आहे.
1996-97 च्या ठळकवाडी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना सूचना कळाव्यात व प्रार्थना, स्तोत्र ऐकता यावेत व त्यांच्या दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने व्हावी यासाठी प्रत्येक वर्गासाठी असे 15 साऊंड बॉक्स भेट दिली आहे. त्याचप्रमाणे सर्व बॉक्सची जोडणीही या विद्यार्थ्यांनी करून दिली
आहे.
यावेळी शाळेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एस. वाय. प्रभू, मुख्याध्यापक आर. आर. कुडतुरकर, अभिजित मुतगेकर, श्रीधर जोशी, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास खटावकर यांनी केले, तर आर. आर. कुडतुरकर यांनी आभार मानले.









