वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बीसीसीआयचे माजी निवड सदस्य तसेच राजस्थान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार किशन रूंगठा यांचे जयपूरमधील एका खासगी रूग्णालयात वयाच्या 88 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले.
भारतीय क्रिकेट क्षेत्रातील कुशल प्रशासक रूंगठा यांना गेल्या आठवडय़ात कोरोनाची बाधा झाल्याने त्यांना जयपूरमधील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी त्यांचा अखेर कोरोनाने बळी घेतला. 1998 साली रूंगठा मध्यविभागातून राष्ट्रीय निवड सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 1953 ते 1970 या कालावधीत 59 प्रथमश्रैणी सामन्यात 2717 धावा जमविल्या आहेत. राजस्थान क्रिकेटमध्ये गेल्या पाच दशकांच्या कालावधीत रूंगठा कुटुंबियांनी आपले वर्चस्व ठेवले होते.









