बेंगळूर/प्रतिनिधी
माजी राष्ट्रपती, भारतरत्न प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे बुधवारी होणार केम्पेगौडा जयंती उत्सव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती बीबीएमपीने दिली आहे.
केम्पेगौडा जयंती उत्सव दुसर्या वेळी स्थगित करून पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी ८ एप्रिल रोजी जयंती उत्सव आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले होते, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रद्द करून तो पुढे साजरा करण्याचे ठरविले होते.
गेल्या आठवड्यात, बीबीएमपीने २ सप्टेंबर रोजी साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु माझी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे देशात राष्ट्रीय दुखवटा असल्याने जयंती उत्सव रद्द केला आहे.









