ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुखर्जी यांनीच ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली आहे.
मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मी एका दुसऱ्या कामासाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तेव्हा मी कोरोना टेस्ट करून घेतली. त्याचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. मागील आठवडाभरात माझ्या संपर्कात जे आले आहेत, त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.









