प्रतिनिधी / करमाळा
करमाळा तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून सरसकट पिकांचे पंचनामे करणे गरजेचे आहे, प्रशासन मात्र केवळ नगदी पिकांची नुकसान पंचनामे करत असून याबाबत सविस्तर अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देऊ असे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी स्पष्ट केले.
उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवशंकर जगदाळे, भारतीय जनता पार्टी शेतकरी आघाडीचे केकान शेतकरी संघटनेचे वारे आधी पदाधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या.
करमाळा तालुक्यात ऊस, कांदा, केळी? भाजीपाला पिके याचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी मातीसह वाहून गेले आहेत,अनेकांचे जनावरे वाहून गेले आहेत, याचा संपूर्ण अहवाल मुख्यमंत्र्यांना आपण देणार असून उद्या याबाबत करमाळा तहसीलदार समीर जी माने यांची भेट घेऊन पंचनामे करण्याचे वेग वाढवणे संदर्भात भेट घेणार असल्याचे सांगितले.
पंचनामे करण्यास संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, सर्कल नुकसानग्रस्त शेतकर्यांची अडवणूक करत असेल तर त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महेश चिवटे यांनी केले आहे. नुकताच करमाळा तालुक्याचा दौरा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
या दौऱ्यात फडणविसांनी शेतकऱ्यांना वेळ न देता भाजपच्या कार्यकर्त्यांची संवाद साधत जास्त वेळ घालवला तसेच जेऊर येथे ज्या शेतकऱ्यांची सात गाई वाहून गेल्या, त्या शेतकरी संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले. त्याच्या घरासमोरून फडणवीस साहेबांची गाडी गेली मात्र त्यांनी त्या शेतकऱ्याची खाली उतरून साधी विचारपूस सुद्धा केली नाही, याबद्दल शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे व कार्यकर्ते यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









