बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी कोरोनामुक्त झाले आहेत. कुमारस्वामी यांनी शनिवारी संसर्ग झाल्यापासून ठीक एक आठवड्यानंतर ते बरे झाल्याचे म्हंटले आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
दरम्यान माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विटमध्ये , “तुमच्या सर्वांचे प्रेम, लवकर बरे होण्यासाठी केलेल्या प्रार्थनांमुळे मी कोविड -१९ मधून बरा झाला आहे आणि मी दवाखान्यातून घरी परत आलो आहे,” असे त्यांनी म्हंटले आहे. कुमारस्वामी यांना कोरोना झाल्यांनतर उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल केले होते.
कुमारस्वामी यांनी “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मला आणखी दोन आठवडे लोकांना भेटणे शक्य होणार नाही,” यासाठी त्यांनी लोकांच्या सहकार्याची विनंती केली.