ऑनलाईन टीम / काबुल :
तालिबानने सत्ता काबिज केल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. भीतीपोटी अनेक नागरिक देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तानचे माजी संचार मंत्री सय्यद अहमद शाह सादत यांनीही देश सोडून जर्मनीत आश्रय घेतला आहे. जर्मनीत सय्यद यांच्यावर पिझ्झा डिलिव्हरी करण्याची वेळ आली आहे. जर्मनीतील इएचए न्यूजने यासंदर्भात फोटोही शेअर केले आहेत.

सय्यद शाह यांनी वर्षभरापूर्वीच अफगाणिस्तानात संचार मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर भीतीपोटी त्यांनी जर्मनीत आश्रय घेतला. जर्मनीत उदरनिर्वाह करण्यासाठी ते आता पिझ्झा डिलिव्हरी करण्याचे काम करत आहेत. जर्मनीतील लीपजिगमध्ये सायकलवरून पिझ्झा डिलिव्हरी करताना त्यांचे फोटो व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, याबाबत माजी मंत्र्यांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केले नाही.









