एम. के. गणपती आत्महत्या प्रकरण : सीबीआयचा अहवाल योग्यच-उच्च न्यायालय
बेंगळूर : डीवायएसपी एम. के. गणपती यांच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआयचा अहवाल न्यायालयाने उचलून धरला आहे. त्यामुळे माजी मंत्री के. जे. जॉर्ज, आयपीएस अधिकारी प्रणब मोहंती आणि एम. एन. प्रसाद यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
17 जुलै 2016 रोजी डीवायएसपी एम. के. गणपती यांनी मडिकेरी येथील लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तत्कालिन गृहमंत्री के. जे. जॉर्ज, पोलीस अधिकारी प्रणब मोहंती आणि एम. एन. प्रसाद यांच्या दबावामुळे गणपती यांनी आत्महत्या केल्याचा आरोप झाला होता. दरम्यान, सीबीआयने तपास करताना जॉर्ज, मोहंती व प्रसाद यांना क्लिन चीट दिली होती. याविरोधात गणपती यांचे वडील कुशालप्पा यांनी लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सीबीआयचा बी रिपोर्ट फेटाळून लावत तिघांना समन्स बजावले होते. याविरोधात जॉर्ज, प्रणब मोहंती, एम. एन. प्रसाद यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.









