ऑनलाईन टीम / शिमला :
फतेहपुर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे आमदार सुजान सिंह पठानिया यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.

सुजान सिंह पठानिया हे एक करारी आणि कट्टर नेता होते. हिमाचल प्रदेशच्या 13 व्या विधानसभेत ते डिसेंबर 2017 मध्ये ते सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी 11 वेळा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांना 7 वेळा विजय तर 4 वेळा पराजय स्वीकारावा लागला होता. 1977 मध्ये त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर 1982, 1985, 1992 आणि 2007 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
सुजान सिंह पठानिया यांचा जन्म 22 सप्टेंबर 1943 मध्ये लाहोर मध्ये झाला होता. बीएची डिग्री मिळवल्यानंतर त्यांनी फॉरेस्ट रेंजर्स कॉलेज देहरादूनमधून फोरेस्ट्रीमध्ये दोन वर्षांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर हिमाचल प्रदेशात रेंज अधिकारी काम पाहिले . 1977 मध्ये ते जनता पक्षात सहभागी होण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर 1980 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.









