वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे माजी पोलीस महासंचालक आणि अलिकडेच स्वेच्छानिवृत्ती घेणारे गुप्तेश्वर पांडे रविवारी संयुक्त जनता दलात सामील झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी पांडे यांनी संजदचे सदस्यत्व स्वीकारले आहे. पक्षाच्या आदेशाप्रमाणे वागणार आहे. निवडणूक लढविण्यास सांगण्यात आल्यास तेही करणार आहे. बिहारच्या प्रत्येक जिल्हय़ातील लोक त्यांच्या मतदारसंघात उमेदवार म्हणून उभा राहण्यास सांगत आहेत असा दावा पांडे यांनी केला आहे. एक दिवसापूर्वीच त्यांनी r नितीश कुमार यांची भेट घेतली होती. पोलीस महासंचालक म्हणून कर्तव्यांचे पालन करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य दिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी आल्याचा दावा पांडे त्यांनी त्यावेळी केला होता.









