ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी रात्री त्यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन औषध आणि ताप आल्याने 87 वर्षीय मनमोहनसिंग यांना रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी त्यांची प्रकृती स्थिर होती. ताप देखील पूर्णपणे गेला होता. त्यानंतर आज त्यांचे पुन्हा पूर्ण तपासणी केली असता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, या ठिकाणी त्यांची कोरोना ची चाचणी देखील करण्यात आली. त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मनमोहन सिंग हे हार्ट पेशंट असून यादी त्यांची दोन वेळा बायपास सर्जरी करण्यात आले आहे. तसेच त्यांना मधुमेहाचा त्रास आहे. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.









