ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
छातीत दुखू लागल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सिंग यांना कार्डियो थोरासिक वॉर्डमध्ये ठेवण्यात आले असून, एम्सच्या कार्डिओलॉजीचे प्रोफेसर डॉ. नितीश नाईक यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
87 वर्षीय माजी पंतप्रधानांची दोन वेळा बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. याशिवाय 2003 मध्ये त्यांची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. ते 2004 ते 2014 या काळात दोन वेळा भारताचे पंतप्रधान होते. त्यांनी यूपीए -1 आणि यूपीए -2 चे नेतृत्व केले आहे. सध्या ते राजकारणात सक्रिय नाहीत.









