मुंबई / ऑनलाईन टीम
माजी खासदार राजू शेट्टी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही राजू शेट्टी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आता दुसऱ्या लाटेतही ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राजू शेट्टी यांनी गेल्या तीन महिन्यांपासून जयसिंगपूर येथे शिवार कोविड सेंटर सुरू करून सर्व सामान्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याचबरोबर इचलकरंजी, जयसिंगपूरसह जिल्ह्यातील अन्य बाजारपेठ सुरू करा, या मागणीसाठी त्यांनी इचलकरंजी येथे आंदोलन केले होते.








