ओटवणे / प्रतिनिधी:
विद्यार्थी- ग्रामीण उद्योजकता जागृती विकास योजना अंतर्गत दापोली येथील कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या रामानुज भिवा कुंभार या विद्यार्थ्याने माजगाव कासारवाडा येथे जीवामृत आणि बीजामृताची निर्मिती व वापराबाबत प्रात्यक्षिकासहीत मार्गदर्शन केले. यावेळी नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचे तसेच एकात्मिक खत व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
सध्या रासायनिक कृषी निविष्टांच्या अयोग्य आणि अतिवापरामुळे आर्थिक तसेच अनेक प्रकारचे पर्यावरणीय नुकसान होत आहे. त्यात आपली खालावत चाललेली रोगप्रतिकारक क्षमता यांमुळे विषमुक्त शेतीचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे. पर्यायाने सध्या सेंद्रिय व नैसर्गिक शेतमालाकडे वाढता कल पाहता हे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल असा विश्वास यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी सौ. सीमा कासार, रमाकांत कासार, दिक्षा कासार, अर्चना कासार आदीसह शेतकरी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









