वर्षाच्या आधारे 6.3 टक्क्यांनी तेजीत – मंत्री गिरिराज सिंह यांची माहिती
नवी दिल्ली
भारतामध्ये दूध उत्पादन मागील सहा वर्षाच्या दरम्यान वर्षाच्या आधारे 6.3 टक्क्यांप्रमाणे वाढले आहे, अशी माहिती केंद्रीय मत्स्य पालन, पशुपालन आणि डेअरी मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली. जागतिक दुध दिवसाच्या निमित्ताने आयोजीत कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.
प्रत्येकाची दुधाची रोजची गरज आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 406 ग्रॅमवर पोहचली आहे. 2013-14 मध्ये ही दुधाची गरज 307 ग्रॅम इतकी होती. वर्षाच्या आधारे पाहता मागणी जशी वाढली आहे तशी उत्पादनातही वाढ करण्यात आली आहे. भारताने वर्ष 2019-20 च्या दरम्यान 19.84 कोटी टन दूध उत्पादन केले आहे. गेल्या 6 वर्षाचा आढावा घेतला गेल्यास वार्षिक तत्वावर 6.3 टक्के इतकी दूध उत्पादनात वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक दुध उत्पादन 1.5 टक्के प्रति वर्षाला वाढते आहे. गहू आणि धान्याच्या एकूण उत्पादन मूल्यापेक्षा दुध उत्पादन मूल्य अधिक असल्याची माहिती यावेळी सांगितली आहे.









