वृत्तसंस्था/ लखनौ
केंद्र सरकारने मागासवर्गीयांची जनगणना करण्याचा निर्णय घेतल्यास बहुजन समाज पक्ष त्याचे समर्थन करेल, अशी घोषणा या पक्षाच्या नेत्या मायावती यांनी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही केंद्राकडे अशीच मागणी केली आहे. भारतात जातीनिहाय जनगणना केली जावी, अशी मागणी बऱयाच काळापासून होत आहे. मात्र, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वगळता इतर जातींची वेगळी गणना केली जात नाही. केंद्रातील सरकारने हा नवा पायंडा सुरू करावा, अशी मागणी सहा राजकीय पक्षांनी आतापर्यंत केली आहे.









