बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांचा इशारा : कागवाड येथे ‘शरणू शरणार्थी’ कार्यक्रम
प्रतिनिधी / कागवाड
ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाज, गुजरातमध्ये पाटीदार समाज तीव्र आंदोलन उभारून आपला हक्क मिळविण्यात यशस्वी झाला आहे. याच धर्तीवर कर्नाटकात पंचमसाली समाजाला 2ए आरक्षण मागणी करण्यात येत आहे. याबाबत केवळ आश्वासनेच मिळत असून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी येत्या 6 महिन्यांत तुमच्या मागण्या पूर्ण करू, असे सांगितले आहे. जर आपली मागणी पूर्ण झाली नाही तर आणखी तीव्र लढा देण्याचा इशारा बसवजय मृत्युंजय महास्वामीजी यांनी दिला. येथील मल्लिकार्जुन शिक्षण संस्थेच्या सभाभवनात कागवाड तालुका पंचमसाली लिंगायत समाजाच्यावतीने ‘शरणू शरणार्थी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
महास्वामीजी पुढे म्हणाले, गत कित्येक वर्षांपासून समाज बांधव आपल्या मागण्यांसाठी तहसीलदारांपासून मंत्र्यांना निवेदन दिले. मात्र, याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे समाज बांधवांनी समाजाला 2ए आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे. यासाठी लिंगायत समाज नेते, आमदार बसनगौडा पाटील, काशप्पन्नवर यांच्यासह अन्य प्रमुखांनी सरकार व समाजाच्या प्रमुखांचा विरोध पत्करून आंदोलन छेडले. याची मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दखल घेऊन येत्या 6 महिन्यांत तुमच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
यावेळी समाजप्रमुख एम. एस. रुद्रगौडा, रयत संघाचे राज्याध्यक्ष अमरेश नागोर, बी. एस. नागराळ, सुभाष कोप्पद, नारायण को÷ाr, कागवाडचे समाजप्रमुख प्रकाश पाटील, रमेश चौगुले, अशोक पाटील, काका पाटील, ज्योतीकुमार पाटील, चिदानंदा अवटी, चेतन पाटील, शिवानंद अवटी, जे. के. पाटील, शशिकांत घुमटे, शिवानंद नविनाळ, उमेश पाटील यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.