2015 नंतर आजवरच्या घरांच्या किमतीचा आढावा घेतल्यास देशभरातील महत्त्वाच्या शहरात किमती नाममात्र वाढल्या आहेत, असे दिसून आले आहे. सध्याला किंमतीवर दबाव वाढतो आहे. सध्या कोरोनाचा परिणाम दिसून येत असून या क्षेत्रातल्या हालचाली आता कुठे वेग पकडू लागल्या आहेत. येणाऱया काळात दबावामुळे किंमती आणखी कमी होणार का हे पाहावे लागेल.
2015 नंतर देशातील महत्त्वाच्या शहरात घरांच्या किमती नाममात्र वाढल्या आहेत. प्रॉपटायगर डॉट कॉमने या संबंधीची माहिती अहवालातून दिली आहे. मुंबईचा विचार केल्यास 2015 नंतर येथील रहिवासी बाजारपेठेचा एकत्रित वार्षिक विकास दर 2.8 टक्क्मयांनी वाढला आहे. देशभरातल्या विविध शहरातील स्थावर मालमत्तांच्या प्रति चौरस फूट किंमती जाणून घेतल्या असता 9 हजार 446 रु. प्रती चौ. फू. हा सर्वाधिक सरासरी दर होता असे दिसले. बेंगळूर शहरातील दरही 2.8 टक्के वाढल्याचे (2015 नंतर) दिसून आले आहे.
मागणी घटली
गेल्या 5 वर्षाच्या कालावधीत दिवाळखोरीची अनेक प्रकरणे घडली होती. ही प्रकरणे उत्तर भारतातील राज्यात अधिक प्रमाणात होती. त्यामुळे अनेक प्रकल्पांना खूप विलंब झाला होता. इतरत्र किमती कमी झाल्याचे निदर्शनास आले तरी हैदराबादमध्ये मात्र किमती वाढलेल्या दिसून आल्या. 2014 मध्ये आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन झाले. विभाजनानंतर अस्थिरता दूर सरल्याने हैदराबादमध्ये किमती वाढल्याचे सांगितले जाते. हैदराबाद व मुंबई शहरांनी मालमत्ता दरात वाढ दर्शवली आहे. नोएडा व गुरुग्राम शहरात मात्र 5 वर्षात स्थावर मालमत्तांच्या किमती घटल्या. वार्षिक 3 टक्के एकत्रित विकास दरामुळे अहमदाबाद हे शहर अफोर्डेबल गटात नाव कमावून होते. दोन हजार 974 प्रती चौ. फू. इतका सरासरी कमी दर या शहरात स्थावर मालमत्तांवर आकारला जातो. पाठोपाठ नोएडात 3922 रु. इतका प्रति चौ. फूट सरासरी दर राहिला. कोलकात्यात 2015 नंतर किमतीत 4 टक्के वाढ दिसली. चेन्नईत सरासरी चौ. फू. दर 5 हजार 221 रुपये इतका होता. एकंदर 2015 नंतरच्या वर्षात अनेक शहरांमध्ये घरांच्या किमतीत अंशता किंवा त्यापेक्षा काही प्रमाणात किमती कमी झाल्या आहेत. सध्या कोरोनाचा परिणामही या क्षेत्रावर चांगलाच दिसून येत असून ठप्प असलेल्या हालचाली पुन्हा वेग पकडण्याच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. तरीही किमतीवर दबाव कायम असून येणाऱया काळात मागणीत वाढ व्हावयाची झाल्यास नफ्यावर नियंत्रण मिळवत किंमती करण्याचे आव्हान बिल्डरांपुढे असणार आहे.