वीज-औद्योगिक क्षेत्राच्या मागणीचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोल इंडिया लिमिटेडची (सीआयएल) ई-लिलावच्या मदतीने विक्री ऑक्टोबर महिन्यात जवळपास तीन पटीने वाढली असून ती 1.68 कोटी टनावर पोहोचली आहे. वीज क्षेत्रातून कोळसा मागणीत वृद्धी झाली आहे. याचाही सकारात्मक परिणाम पहावयास मिळाला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
एक वर्षाच्या समान कालावधीत सीआयएलचा ई-लिलावाच्या मदतीने कोळसा बुकिंग 58 लाख टन झाले होते. ऑक्टोबर महिन्यात 190 टक्के किंवा 110 लाख टन इतक्या प्रमाणात मागणीने जोर पकडला असल्याचे माहितीतून स्पष्ट होत आहे.
कोविड19 महामारीच्या कारणामुळे मागणीत मोठी घसरण राहिली होती. याचा प्रभाव येत्या काळातही काही प्रमाणात राहणार असल्याचे संकेत गेल्या काही महिन्यात व्यक्त केले जात होते. परंतु चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सात महिन्यात ई-लिलावामधून एकूण 590 लाख टन कोळशासाठी बुकिंग करण्यात आले आहे.









