वार्ताहर/ माखजन
संगमेश्वर तालुक्यातील माखजन परिसरात पुराचे पाणी शिरल्याने शेती पाण्याखाली गेली आहे. मागील चार दिवस मुसळधार पाऊस सुरु असल्याने गडनदीचे पाणी कासे, माखजन, असावे, पेढांबे, नायशी, कळंबूशी आदी गावातील नदीकाठच्या शेतीत पाणी शिरले आहे. सोमवारी शेतीतील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. शेतीमध्ये दीर्घकाळ पाणी राहिल्यास भातशेती कुजण्याची शक्यता असल्याने शेतकरी काळजीत आहेत. माखजन बाजार पेठेतील पाणीही ओसरू लागले आहे.









