वार्ताहर / हरमल
मांदेहून चोपडेला जाणाऱया टुरिस्ट टॅक्सी चालकाचा एका वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने गाडी झाडास ठोकर देत थांबली. यात वाहनाचे बरेच नुकसान झाले असून सुदैवाने चालकास किरकोळ दुखापत झाली.
मंगळवारी संध्याकाळी 6 च्या सुमारास जीए 11 टी 1983 ही एर्टीगा टॅक्सी सलसा रेस्टॉरंट नंतरच्या वळणावरून थेट काजूच्या झाडावर धडक देऊन थांबली. चालक एच. हडफडकर यांचा वाहनावरील ताबा सुटल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. वाहन रस्ता सोडून जात असल्याचे पाहून चालक भांबावला व पाण्यामुळे वाहनाचा ब्रेक वर्क झाला नसल्याचे समजते. या घटनेमुळे वाहनाचे किमान लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
रस्त्याला ओहोळाचे स्वरूप
दरम्यान,बोडकोधेनू उतार काढल्यानंतर मांदेच्या बाजूने रस्त्याच्या एका बाजूचा गटार दगडधोंडय़ानी भरल्याने, पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असते. त्या पाण्यामुळे वाहन थांबविणे धोक्मयाचे असते व ब्रेक कदापि चालत नसल्याचे बहुतेक चालकांचे म्हणणे आहे. पावसाळय़ात रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने कित्येकदा वाहतूक एकेरी चालू असते त्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्मयता असतात. त्यातच, भरधाव जाणाऱया वाहनांमुळे, दुचाकीस्वारांना जलस्नान घडण्याचे प्रकार अनेकदा घडल्याचे वाहनचालक संतोष पेडणेकर यांनी सांगितले.
दरम्यान, मांदेचे कार्यक्षम सरपंच सुभाष आसोलकर यांनी जातीनिशी लक्ष घालून रस्त्यावरून वाहणारे पाणी व गटारांची समस्या सोडवावी, अशी मागणी वाहन चालकांतून केली जात आहे.









