चित्रकला व वेशभूषा स्पर्धेत ॐकार गोडकर प्रथम
पालये /
सरकारी प्राथमिक विद्यालय नाईकवाडा मांदे आयोजित महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती दिनाचे औचित्य साधून ऑनलाईन वरून शाळेच्या मुख्याध्यापिका सुचित्रा केरकर व शिक्षिका दिया हरमलकर यांनी गांधी व शास्त्रीजींच्या शौर्याबद्दल व त्यांच्या उज्ज्वल कार्याबद्दल मुलांना माहिती करून दिली. दरम्यान, महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्रीजींच्या तसबिरीला शाळेच्या मुख्याध्यापिकांनी हार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ऑनलाईनपद्धतीने वेशभूषा व चित्रकला स्पर्धा इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. त्यात ॐकार महेश गोडकर या हुशार विद्यार्थ्याने दोन्ही स्पर्धेत अव्वल स्थान प्राप्त केले, तर सांज विष्णु मांदेकर दोन्ही स्पर्धेत द्वितीय आली. तसेच राशी राजन केरकर वेशभूषा स्पर्धेत तिसऱया क्रमांकावर राहिली, तर सर्वेश समीर आचार्य या विद्यार्थ्यास चित्रकला स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळाला. वेशभूषा स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक सर्वेश समीर आचार्य याला लाभला.
त्याचप्रमाणे इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला, क्राफ्ट तयार करणे, वेशभूषा अशा विविध स्पर्धांमध्ये शिवम प्रदीप तिरोडकर, शशिकांत दाजी दाबोलकर, वेद कमलाकांत मांदेकर , कृतिका दिलीप नाईक, निखिल नितेश नाईक, स्वरूप सचिन आचार्य, सनया सूर्यकांत गडेकर, शौनक सुदिन नाईक, ऋत्विक राजेश नाईक, अर्चना बाबू पाटील यांनी भाग घेतला होता. शिक्षिका दिया हरमलकर यांच्या देखरेखेखाली ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिकांनी अभिनंदन करून सहकार्य केलेल्या पालकांचेही विशेष आभार मानले. स्वतःची व मुलांची काळजी घ्यावी, असे पालकांना आवाहन केले. तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱयांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे ऑनलाइन वरून अभिनंदन केले.