प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ासह रत्नागिरीकरांचे विरंगुळ्याचे ठिकाण असणारी मांडवी जेटी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा झळाळली आह़े गेले काही महिने या जेटीवरील बंद दिवे चालू करण्यासाठी मांडवी पर्यटन संस्थेने पुढाकार घेतला होत़ा
राज्यभरात थंडीची सर्वदूर चाहूल लागली आह़े त्यामुळे पर्यटकही जिह्यामध्ये दाखल होण्यास सुरुवात होत आह़े शहरात असणाऱया मांडवी जेटीला हजारो पर्यटक व रत्नागिरीकर भेट देत असतात़ ‘गेट वे ऑफ रत्नागिरी’ असणाऱया मांडवीला शासनाने ब दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून जाहीर केले आह़े पर्यटकांसह तरुणवर्ग, आबालवृध्द येथे विरंगुळ्यासाठी येत असतात़ तसेच रात्रीच्या वेळच्या दिव्यांमुळे मांडवी जेटीच्या सौंदर्यात भर पडत़े मात्र मागील काही दिवसांमध्ये हे दिवे बंद झाल्यामुळे मद्यपींचा अड्डा झाला होत़ा ही बाब हेरुन बंद †िदवे चालू करण्यासाठी मांडवी पर्यटन संस्थेने पाठपुरावा सुरु केला होत़ा त्यामुळे याची दखल घेत मेरीटाईम बोर्डाने बंद दिवे चालू केल़े त्यामुळे दिवाळीमध्ये मांडवी जेटी पुन्हा दिव्यांनी उजळून निघाली आह़े
मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱयांनी संबंधित मक्तेदाराला माहिती देवून दिवे दुरुस्त करुन घेतल़े रात्री उशीरा समाजकंटक हे शोभिवंत दिवे फोडून टाकतात़ वायर व टायमरचीही चोरी करत असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आह़े त्यामुळे रात्रीच्या सुमारास येथे शहर पोलिसांमार्फत गस्ती मागणी शहरवासियांनी केली आह़े तसे मांडवी जेटी परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याच्या मागणीचे निवेदन मांडवी पर्यटन संस्थेने शहर पोलिसांना दिले.









