वार्ताहर /मांजरी
मांजरी येथे प्रांताधिकारी युकेशकुमार यांनी भेट देऊन महापुरात नुकसानग्रस्त झालेल्या घरांची पाहणी केली. नुकत्याच आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील गावात अनेक घरांची पडझड झाली असून पूरग्रस्तांना घरांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडून आदेश देण्यात आले आहेत. महापुराच्या प्रभावाने पडलेल्या घरांचा सर्व्हे करण्यासाठी अधिकारी वर्गाला सूचना देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी युकेशकुमार यांनी मांजरी, येडूर, चंदूर आदी गावातील पडलेल्या घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱयांना सूचना देत घरांचा सर्व्हे पारदर्शी करावेत, असे सांगितले. यावेळी तहसीलदार प्रवीणकुमार जैन, प्रभारी उपतहसीलदार संतोष हिरेमठ, अभियंता विरुपाक्ष भंडारकर, ग्रामविकास अधिकारी विरुपाक्ष पोतदार, तलाठी मनोज कांबळे, कार्यदर्शी प्रमोद मल्लव्वागोळ, ग्रामपंचायत अध्यक्ष पांडुरंग माने यांच्यासह सर्व ग्राम पंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.









