वृत्तसंस्था/ मोनॅको
पुढील आठवडय़ात येथे सुरू होणाऱया एटीपी टूरवरील माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धेतून फ्रान्सचा टेनिसपटू रिचर्ड गॅस्केटने दुखापतीमुळे तसेच कोरोना महामारी समस्येमुळे माघार घेतली आहे.
एटीपी मानांकनात 49 व्या स्थानावर असलेल्या रिचर्ड गॅस्केटने 2005 साली माँटे कार्लो क्ले कोर्ट मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती. पायाच्या तळव्याला झालेल्या दुखापतीमुळे गॅस्केटने ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत भाग घेतला नव्हता. 2021 च्या टेनिस हंगामात कोरोना समस्येमुळे गॅस्केटला अनेक स्पर्धांमध्ये आपला सहभाग दर्शविता आला नाही.









