प्रतिनिधी / सांगरुळ
गावात विकास कामे होण्यासाठी ग्रामस्थांची एकजूट महत्त्वाची आहे. गावच्या सर्वांगिण विकासासाठी गटातटाचे राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने काम केल्यास विकास घडतो. असे प्रतिपादन जि.प. सदस्य सुभाष सातपूते यांनी केले. महे (ता. करवीर) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कविता पाटील होत्या .
महे येथे दलित वस्ती सुधार योजनेतून अंतर्गत रस्ते आणि गटर्ससाठी सुमारे पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा शुभारंभ सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माझी सरपंच बुध्दीराज पाटील म्हणाले, कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून सामान्य जनतेच्या विकासासाठी निधी प्राप्त होत आहे. अशा विकासकामांच्या माध्यमातून गावाचा निश्चितपणे विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. करवीर पं. स. च्या सभापती अश्विनी धोत्रे यांनी, कार्यकत्यांना संघटीत करुन त्यांची ताकद गाव पातळीवर उभी करून विकास कामे करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
यावेळी कार्यक्रमात गोकूळचे संचालक बाळासाहेब खाडे, उपसरपंच निवास पाटील, सत्यजीत पाटील, सज्जन पाटील, करवीर पंचायतीचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, सचिन पाटील, उत्तम पाटील आदी उपस्थित होते.








