कसबा बीड / प्रतिनिधी :
महे तालुका करवीर येथे वन्यप्राण्यांने 20 बकऱ्यांचा फडशा पाडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार महे येथील नवाळे मळा या शेतामध्ये कृष्णात भागोजी पुजारी यांची बकरी बसवली होती. बकरी चरण्यासाठी बाहेर घेऊन गेल्यानंतर तळावरती लहान पिल्ले (कोकरी) डाळून ठेवली होती. तळावर कोणी नसल्याने रानटी प्राण्याने हल्ला केला. या हल्ल्यात एक मयत व 11 पिल्ले गंभीर जखमी झाले. यामध्ये पुजारी यांचे जवळपास दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
करवीर तालुक्यातील सावरवाडी, खुपिरे व कांडगाव पाठोपाठ महे आठवड्यातील ही चौथी घटना घडली असून धनगर समाजामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही माहिती मिळताच वनविभागासह जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाला कळविले, करवीरचे वनपाल विजय पाटील, करवीरचे वनरक्षक रुपेश मुल्लानी, राहुल जोधवाल, डॉ. वाळवेकर व जि. प. चे डॉ इंगळे हेही घटनास्थळी दाखल झाले. रानगे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
एका आठवड्यात सावरवाडी, खुपिरे, कांडगाव व महे अशा स्वरूपाच्या सलग चार घटना घडल्या आहेत. वन्य प्राण्याच्या हल्ल्यातील या घटनेमुळे मेंढपालांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करणार असल्याचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी सांगितले









