प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील महे गावामध्ये भैरवनाथ डोंगर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. शहरा पाठोपाठ ग्रामीण भागात सुद्धा अतिक्रमण हा गंभीर प्रश्न बनत चालला आहे. याकडे वेळीच लक्ष देणे देणे गरजेचे झाले आहे.
2021 ची ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर सर्व प्रशासन व्यस्त असताना व व शासनाकडून ग्रामपंचायतमध्ये प्रशासकांची नियुक्ती झालेली असतानाच गावातील अनेकांनी भैरवनाथ डोंगर येथे रिकामी असलेली सर्वे नंबर 138 या गटातील 16 हेक्टर 72 आर या जागेत काहींनी लाकडी पोल, दगडी चिरा व कच्चा बांधकामामध्ये पत्रा टाकून जागा करण्याचा प्रयत्न केला आहे.
तर काहींनी साड्यांच्या पट्ट्या तयार करून व चिंध्या बांधून आपली जागा राखीव केल्याचा प्रकार भैरवनाथ डोंगराजवळ दिसून येत आहे. तसेच या डोंगरावर उत्खनन करून मुरूम विकण्याचा प्रकार सुद्धा राजरोस सुरू आहे. शासकीय प्रशासक असताना अशा होणाऱ्या अवैध धंद्यास वेळीच अटकाव केला नाही तर पुढील समस्येस तोंड देण्यास गावातील प्रमुख जबाबदारी घेणार का ? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीतच आहे. त्यामुळे प्रशासकानी वेळेत लक्ष घालून प्रसंगी जिल्हा प्रमुखांनी होणारे अतिक्रमण टाळणे योग्य होईल, अशी गावात कुजबुज चालू आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









