अक्कलकोट / प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील एका गावात ४५ वर्षीय महिलेवर लज्जास्पद वर्तणूक केल्याप्रकणी योगेश तुळशीराम होटकर रा. पानमंगरुळ, ता. अक्कलकोट यावर अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि २१ रोजी सायंकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळेलेली माहिती अशी की, अक्कलकोट तालुक्यातील एका गावातील ४५ वर्षीय महिलेवर रात्रीच्या सुमारास संशयीत आरोपी योगेश तुळशीराम होटकर रा पानमंगरूळ हा फिर्यादीवर वाईट कृत्य करण्याच्या उद्देशाने घरात येऊन लज्जास्पद असे कृत्य करून घटनास्थळावरून पळ काढला, अशी तक्रार फिर्यादीने पोलीस ठाण्यात दिली आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. कलशेट्टी करीत आहेत.