ऑनलाईन टीम / मुंबई :
स्त्री नसते केवळ वस्तू, ती असते नवनिर्मितीची गाथा जिथे आपण सर्वांनी टेकवावा माथा, असे म्हणत अजित पवारांनी महिलांसाठी खास घोषणा जाहीर केल्या.
यामध्ये राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा केली. नवीन घरं विकत घेताना गृहिणीच्या नावावर केल्यास मुद्रांक शुल्काच्या प्रचलित दरामध्ये सवलत दिली जाणार. पण, घर महिलेचा नावावर असले पाहिजे, असे अजित पवार म्हणाले.
- शाळकरी मुलींना मोफत एस. टी प्रवास
सर्व विद्यार्थिनींना शाळेत येण्या जाण्यासाठी मोफत एस.टी प्रवास, त्यासाठी 1500 CNG आणि हायब्रिड बस देणार असे त्यांनी सांगितले. तेजस्विनी योजनेअंतर्गत या विशेष बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्य राखीव पोलीस दलात पहिला महिला गट स्थापन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संत जनाबाई सामाजिक सुरक्षा आणि कल्याण योजना जाहीर करण्यात आली असून घरकाम करणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या महिलांसाठी 250 कोटी बीज भांडवल दिले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.